हरियाणा – तुमच्या मध्ये जर प्रचंड इच्छाशक्ती आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर तुम्ही यशाला नक्की गवसणी घालू शकतात असे वाक्य आपल्या कानावर नेहमी पडत असते. याच वाक्याचं ताज उदाहरण हरियाणातील एका तरुणी घडवून दिले आहे. हरियाणातील कर्नाल जिल्ह्यातील ज्योती राणी हिने हरियाणा शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेत 500 पैकी 496 गुण मिळवत तिसरा क्रमांक पटकावला आहे.
वडील मजूर म्हणून करतात काम…
ज्योतीचे वडील जसविंदर सिंग रोजंदारी मजूर आहेत आणि आई गृहिणी आहे. कुटुंबात चार बहिणी आणि एक भाऊ आहे. अशा परिस्थितीत एवढ्या मोठ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे अवघड आहे. पण ज्योतीच्या पालकांनी तिला चांगल्या शिक्षणासाठी खासगी शाळेत प्रवेश दिला आहे.
ज्योतीने देखील आपल्या आई वडिलांच्या कष्टाची जाण धरून दहावी मध्ये राज्यात तिसरा क्रमांक पटकावला आहे तसेच शिक्षणाच्या माध्यमातून आपल्या कुटुंबाचा पाय मजबूत करण्याचा निर्धार केला आहे. तसेच ज्योती राणीने पुढे पदवीचे शिक्षण घेऊन आयपीएस अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगले आहे.