नवी दिल्ली – इलॉन मस्क यांनी ट्विटरचा ताबा घेतल्यानंतर कंपनीच्या धोरणासह अनेक गोष्टींमध्ये आमूलाग्र बदल केले आहेत. कास्ट कटिंग करायला येताच मस्क यांनी हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले होते. परंतु आता इलॉन मस्कला यांना आपल्या कृत्याचा पश्चाताप होत असल्याचे जाहीर केले आहे.
मस्क आता काही कर्मचाऱ्यांना परत बोलावण्याचा विचार करत आहे. तसेच गेल्या काही महिन्यांत अनेक कर्मचाऱ्यांना कंपनीने पुन्हा बोलावले आहे. इलॉन मस्क यांनी ऑक्टोबर 2022 मध्ये ट्विटर कंपनीचे सूत्रे हाती घेतली.
आणि नोव्हेंबरमध्ये लगेच मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांना काढून टाकले. त्यांनी त्यावेळी सुमारे 50 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची घोषणा केली होती. इलॉन मस्क यांनी हजारो कर्मचाऱ्यांना काढून टाकल्यानंतर ट्विटरच्या कर्मचाऱ्यांचे प्रमाण 100 टक्क्यांवरून 20 टक्के करण्यात आले आहे.
दरम्यान, इलॉन मस्क यांनी हजारो कर्मचाऱ्यांना काढून टाकल्यानंतर ट्विटरचे कर्मचारी 100 टक्क्यांवरून 20 टक्के करण्यात आले आहे. कंपनीत 7800 कर्मचारी होते, परंतु कपातीनंतर ही संख्या 1,500 च्या आसपास आली आहे.