नवी दिल्ली : गतविजेत्या निखत झरीन हिला स्ट्रांद्जा स्मृती बाॅक्सिंग स्पर्धेत महिलांच्या ५१ किलो वजनी गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा सामना करावा लागल्याने तिचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे.
@christinaboxing wins by a 3-2 split! Both flyweights advance to semifinals! https://t.co/Htydx0n2KN pic.twitter.com/xmprKy7Fye
— USA Boxing (@USABoxing) January 23, 2020
बल्गेरियातील सोफिया येथे ही स्पर्धा सुरू आहे. उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात अमेरिकेच्या क्रिस्टिना क्रूज हिने निखत झरीनचा ३-२ असा पराभव केला.
7️⃣1️⃣st #Strandja International Boxing Tournament, Bulgaria 🇧🇬, Updates!⏏️@nikhat_zareen advanced into the quarterfinals after her opponent- Assenova.S of Bulgaria 🇧🇬 abandoned in the R1 of bout.
Great going, champ!💪#PunchMeinHaiDum #boxing pic.twitter.com/MVOQJ0o4a7
— Boxing Federation (@BFI_official) January 22, 2020
दरम्यान, यापूर्वी स्पर्धेत निखतची दुस-या फेरीत स्थानिक खेळाडू सेवदा असेनोवाविरूध्द लढत होती. मात्र, असेनोवाने सामन्यापूर्वीच माघार घेतल्याने निखतला विजयी घोषित करण्यात आले होते. तर सलामीच्या लढतीत निखतने मौत्ताकि यासमिनचा ५-० असा पराभव करत आगेकूच केली होती.