अभिनेत्री सेजल शर्माची आत्महत्या

मुंबई : दिल तो हॅप्पी है जी या स्टार प्लसवरील मालिकेतील अभिनेत्री सेजल शर्मा हीने शुक्रवारी आत्महत्या केली.

ही अभिनेत्री अभिनय आणि नृत्य मनापासून करत असे. तिचे करियरही उत्तम होते. त्यामुळे व्यावसायिक ताणाऐवजी व्यतक्तीगत कारणांमुळे तिने हे टोकाचे पाऊल उचलले असावे असा संशय आहे.

या मालिकेत तिने मध्यवर्ती भूमिकेत असणाऱ्या अंश बार्गी याच्या मानलेल्या बहिणीची भूमिका साकारली आहे. अभिनयाच्या क्षेत्रात करीयर करता येऊ शकते हे आपल्या मध्यमवर्गीय पालकांना समजावण्यास वेळ लागला असे तिने एका मुलाखतीत सांगितले होते. तिने कधीही आपल्या पालकांकडून आर्थिक मदत घेतली नव्हती, असे सांगण्यात येते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here