बर्लीन : जर्मनीतील रोटएमसी शहरात एका हल्लेखोराने केलेल्या गोळीबारात सहा जण मरण पावले. तर अनेक जण जखमी झाले.
या हल्ल्यात एकाला अटक करण्यात आली आहे. त्यात अन्य कोणी सहभगी असावे, असे वाटत नाही, असे पोलिसांनी सांगितले. माझ्याकडील माहिती प्रमाणे सहा जण मरण पावले आहेत तर अनेक जण जखमी झाले आहेत, असे पोलिसांचा प्रवक्ता रूडॉल्फ बेहेलमायर यांनी सांगितले.
पोलिसांनी पकडलेला आरोपी हा जर्मन नागरिक आहे. मरण पावलेले एकमेकांना ओळखत असावेत असा पोलिसांचा कयास आहे.