पुणे – राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने देशव्यापी बंदची हाक दिला आहे. बुधवारी हा लाक्षणिक संप जाहीर करण्यात आला आहे. मात्र, या संघटनेस राज्य शासनाने मान्यता दिलेली नाही.
त्यामुळे या संपात महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सहभागी होऊ नये, असे आदेश अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांनी काढले आहेत. तसेच जे कर्मचारी या संपात सहभागी होतील त्यांच्यावर नियमानुसार, कारवाई करण्यात येणार आहे.
ही संघटना मान्यताप्राप्त नसली, तरी या संपत पालिकेचे कर्मचारी सहभागी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या कालावधीत प्रशासकीय कामकाज सुरळीत ठेवण्यासाठी शासनाकडून आदेश काढण्यात आले. त्याची अंमलबजावणी महापालिकेकडून करण्यात येणार असून या संपात शासकीय तसेच नियमशासकीय कर्मचाऱ्यांनी सहभागी होणे ही गैरवर्तणूक समजली जाणार आहे.