मुंबई – पहिल्यांदा राज्याचे असलेले वैभव पळवून नेण्याचे काम केंद्राने व गुजरातने थांबवावे. केंद्राकडून नेहमी राज्यावर अन्याय केला जात आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या काळातही उद्योगांची पळवापळवी झाली. पण ते गप्प बसले. आम्ही गप्प बसणार नाही, असे म्हणत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घरात बसून असतात. या सरकारला शोधावे लागते. हे लोक राज्याला गतवैभव मिळवून देणार आहेत काय? असा सवाल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला होता. त्यावर त्यांनी पलटवार केला आहे.
सुभाष देसाई म्हणाले, करोना काळात आम्ही 2 लाख कोटी रुपये आम्ही आणले. जागतिक आर्थिक केंद्राचा मान हा मुंबईलाच हवा. कारण आर्थिक केंद्र हे मुंबईतच आहे. पण गिफ्ट त्यांनी गुजरातला सुरू केले. जे चालतच नाही.
दत्तोपंत ठेंगडी कामगार शिक्षण संस्था नागपुरात होती, ती दिल्लीला हलवली गेली, असं सांगतानाच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठीचे सर्व पुरावे देवूनही केंद्र सरकार निर्णय घेत नाही, असा हल्लाबोलही त्यांनी केला.