ICC’s New Rule : T20 विश्वचषक 2024 जूनमध्ये सुरू होणार आहे. अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या या स्पर्धेपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) मोठा निर्णय घेतला असून, स्टॉप क्लॉक नियम कायमस्वरूपी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
डिसेंबर 2023 मध्ये, ICC ने चाचणी म्हणून हा नियम लागू केला होता, ज्यामध्ये गोलंदाजी संघाला एक षटक संपल्यानंतर निर्धारित वेळेत दुसरे षटक सुरू करायचे होते. असे न केल्याबद्दल नियमानुसार, क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला दंड ठोठावण्यात येत होता. विशेष म्हणजे ICC चा हा नियम आता फक्त T20 नाही तर ODI मध्ये देखील लागू होणार आहे.
ICC to mandate use of stop-clocks in between overs in white-ball cricket ⌛
Details ➡ https://t.co/Tj1symcw1k pic.twitter.com/kOfb3VLtKm
— ICC (@ICC) March 15, 2024
60 सेकंदात चेंडू टाकला नाही तर दंड
ICC ने दिलेल्या माहितीनुसार, स्टॉप क्लॉक नियमानुसार गोलंदाजी करताना संघांना पुढील षटक टाकण्यासाठी वेळेची विशेष काळजी घ्यावी लागेल. गोलंदाजी करणाऱ्या संघाला पुढील षटक सुरू करण्यासाठी फक्त 60 सेकंदांचा अवधी मिळेल, ज्यामध्ये त्यांना पहिला चेंडू टाकावा लागेल.
एक ओव्हर संपताच थर्ड अंपायर स्टॉप वॉच सुरू करतील. क्षेत्ररक्षण करणारा संघ पुढच्या षटकाचा पहिला चेंडू एका मिनिटात टाकण्यात यशस्वी ठरला, तर त्याला केवळ दोनदा पंचांच्या इशाऱ्याला सामोरे जावे लागेल. त्याचवेळी, तसे न केल्यास संघाला आयसीसीकडून कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल. संघावर दंड म्हणून प्रतिस्पर्धी संघाला 5 धावा दिल्या जातील. हा नियम अंमलात आणण्याचा निर्णय पंचांचा असेल ज्यात फलंदाजांमुळे षटक सुरू होण्यास विलंब होतो का, यावरही ते लक्ष ठेवतील.
Ranji Trophy 2024 : चॅम्पियन मुंबईवर पैशांचा पाऊस…! जाणून घ्या, किती मिळाली बक्षिसाची रक्कम…
कोणत्या परिस्थितीत स्टॉप क्लॉक नियम रद्द केला जाऊ शकतो
1. जेव्हा एखादा नवीन फलंदाज षटकांच्या दरम्यान खेळपट्टीवर येतो.
2. अधिकृत पेय ब्रेक दरम्यान.
3. पंचांनी फलंदाजाच्या किंवा क्षेत्ररक्षकाच्या दुखापतीवर ऑनफिल्ड उपचार करण्यास मान्यता दिली आहे.