मुंबई: मुंबईमध्ये मेट्रोचे काम सुरू असताना झालेल्या अपघातात एका कामगाराचा मृत्यू झाला असून, अन्य एक जण जखमी झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, मेट्रोसाठी भूमिगत मार्ग तयार करण्याचे काम सुरू असताना दगड पडल्याने एका कामगाराचा मृत्यू झाला, तर अन्य एक कामगार जखमी झाला आहे.
जखमी कामगाराला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा प्रकार कशामुळे घडला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या संपूर्ण प्रकाराची चौकशी करण्यात येत आहे. मुंबईमध्ये सध्या मेट्रो-3साठी भूमिगत मार्ग तयार करण्याच काम सुरू आहे. ही घटना पवईजवळ घडल्याची माहिती मिळते आहे.