#Ashes : तिसऱ्या कसोटीतून स्टीव्ह स्मिथची माघार

लंडन – ऑस्ट्रलियाचा भरवशाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथला दुखापतीमुळे इंग्लंदविरूद्ध सुरू असलेल्या ऍशेस मालिकेतील तिसऱ्या कसोटीतून माघार घ्यावी लागली आहे. दुसऱ्या कसोटीतील पहिल्या डावात जोफ्रा आर्चरचा चेंडू त्याच्या मानेवर आदळला होता. तिसरी कसोटी गुरूवारपासून सुरू होणार आहे.

ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टीन लॅंगर यांनी सांगितले की, स्मिथची दुखापत गंभीर नसली तरी त्याला आणखी चार पाच दिवस विश्रांतीची आवश्‍यकता आहे. त्यामुळेच आम्ही त्याला तिसऱ्या कसोटीपासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची उणीव आम्हाला जाणविणार आहे. मात्र ही उणीव भरून काढण्याचा प्रयत्न संघातील अन्य खेळाडू करतील अशी मला खात्री आहे.
स्मिथने पहिल्या कसोटीतील दोन्ही डावांमध्ये शतके टोलविली होती. तसेच त्याने दुसऱ्या कसोटीतील पहिल्या डावात 92 धावा केल्या होत्या.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.