ड्‌वेन जॉन्सन म्हणजेच “द रॉक’ अडकला लग्नबेडीत

हॉलिवूडचा अभिनेता ड्‌वेन जॉन्सन उर्फ द रॉकच्या चाहत्यांसाठी खुशखबर आहे. ड्‌वेनने त्याची गर्लफ्रेंड आणि मॉडेल लॉरेन हैशनसोबत विवाह केला आहे. ही माहिती खुद्द त्यानेच इंस्टाग्रामवर फोटो शेअर करून दिली आहे.
ड्‌वेनने 18 ऑगस्ट रोजी लॉरेनसोबत हवाईमध्ये लग्न केले.

या आनंदाच्या प्रसंगी फक्त ड्‌वेन व लॉरेन यांचे नातेवाईकांसोबत जवळचे मित्रमंडळी उपस्थित होते. सूत्रांच्या माहितीनुसार, ड्‌वेन आणि लॉरेन 2007 पासून एकमेकांना ओळखतात. द रॉकला एक्‍स बायको डॅनी ग्रासियापासून एक मुलगी आहे. तसेच लॉरेनपासून ड्‌वेनला एक मुलगा आहे. ड्‌वेन आणि डॅनीनं 1997 साली लग्न केले होते. ते दोघ कॉलेज पासूनचे मित्र होते. ड्‌वेनच्या फिल्मी करियरबद्दल सांगायचं तर द स्कॉर्पियन किंग, फास्ट अँड फ्युरियस सीरिज यासोबत बऱ्याच चित्रपटात काम केले आहे.

नुकताच ड्‌वेनचा हॉब्स अँड शॉ हा फास्ट ऍण्ड फ्युरियसच्या श्रेणीतील चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या चित्रपटात ड्‌वेनसोबत जेसन स्टेथम व इदरिस एल्बा हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×