पाकिस्तानी खेळाडूंना बिर्याणी वर्ज्य, मिस्बाहने घेतला निर्णय

लाहोर – पाकिस्तानचा माजी कर्णधार मिस्बाह उल हक याची पाकिस्तान क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी आणि निवड समितीच्या अध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे. आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर मिस्बाह उल हक याने पाकिस्तानच्या खेळाडूंना शिस्त लावण्याचा निर्णय घेतला आहे.

पाकिस्तानी खेळाडूंच्या फिटनेसवर क्रिकेट विश्वचषक स्पर्धा २०१९ मध्ये अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्यामुळे बिर्याणी आणि इतर जंकफूडपासून दूर राहण्याचे आदेश मिस्बाहने पाकिस्तानी क्रिकेट संघाला देण्यात आले आहेत.

मिस्बाहच्या निवडीनंतर पाकिस्तानी क्रिकेट संघाचे पहिले सराव शिबीर भरवण्यात आले. या शिबिरात पाकिस्तानी खेळाडूंच्या फिटनेसच्या मुद्द्यावर भर देण्यात आला. पाकिस्तानी खेळाडूंच्या आहारात आता बिर्याणी, तेलकट पदार्थ किंवा गोड पदार्थांचा समावेश करण्यात येणार नाही, असे पाकिस्तानी क्रिकेट संघाचे आहार व्यवस्थापन सांभळणाऱ्या कंपनीच्या सदस्याने सांगितले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.