जालना – भाजप नेत्या पंकजा मुंडे या पक्षावर नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सातत्याने रंगतात. पंकजा मुंडेंना जाणीवपूर्वक चुकीची वागणूक दिली जात असून भाजपमधील एक गट हे काम करत असल्याचे धक्कादायक विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
नायब तहसीलदाराने स्वत: लिहून दिला आजीचा अर्ज; सोशल मीडियावर होतंय कौतुक
जालना येथे प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी हे विधान केले. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, भाजपमध्येच पंकजा मुंडे आणि पक्षाला बदनाम करणारा एक गट आहे. तिच लोकं बदनामी करत आहेत. कालच्या माझ्या संपूर्ण प्रवासात पंकजा मुंडे माझ्यानंतर बोलल्या. मी पंकजा मुंडेंना प्रथम स्थान दिले आणि ती माझी जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.
‘सह्याद्रि’ कारखान्यास उत्कृष्ट ऊस विकास व संवर्धनाचा प्रथम पुरस्कार
पंकजा मुंडे आमच्या नेत्या असल्यामुळे त्या आमच्या राष्ट्रीय सचिव आहेत. त्यामुळे त्यांना नंतर बोला. मी आधी बोलतो हा त्यामागील आशय होतो, असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले. पंकजा मुंडे नाराज असल्याच्या प्रश्नावर याआधीही चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली होती.
पंकजा मुंडे माझ्याशी रोज बोलतात. माझी आणि त्यांची परवाच चर्चा झाली. परवा त्यांची प्रकृती ठीक नव्हती. कधीकधी व्यक्तिगत अडचणी येत असतात. एखाद्या कार्यक्रमाला एखादा नेता उपस्थित राहू शकत नाही. प्रत्येक नेत्याची व्यस्तता वेगळी असते, असे बावनकुळे म्हणाले होते.