Pankaja Munde | Lok Sabha Election 2024 | ही निवडणूक माझ्यासाठी आधुनिक काळातील महायुद्ध आहे. मात्र, या महायुद्धामध्ये मला एकही व्यक्ती जखमी व्हायला नको आहे, असे म्हणत पंकजा मुंडे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी केली असल्याचा दावा केला आहे.
या निवडणुकीला जातीचा रंग जरी दिला गेला. तरी समाजातील नागरिक योग्य निर्णय घेतील, असा विश्वास पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला आहे. बीड लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना यावेळी उमेदवारी देण्यात आली आहे. | Lok Sabha Election 2024
त्यांच्या विरोधात शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बजरंग सोनवणे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे आता या निवडणुकीत चांगलीच रंगत आली आहे. या निवडणुकीला जातीचा रंग दिला जाण्याचा प्रयत्न होतोय.
मात्र कोणत्याही समाजाच्या भावना दुखावणार नाही यासाठी मी कसोशीने प्रयत्न करणार असल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले आहे. समाजात कितीही तिढा निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरी विकासासाठी हा समाज माझ्या पाठीशी उभा राहील, असा विश्वास देखील पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला आहे. | Pankaja Munde