Karnataka – कर्नाटकातील (Karnataka) शिक्षकांच्या (teachers) रिक्त जागा त्वरीत भरण्याची सुचना मुख्यमंत्री सिद्धरामय्या (Siddaramaiah) यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना केली आहे. शनिवारी त्यांनी राज्याच्या उच्च शिक्षण विभागाची आढावा बैठक घेतली त्यात त्यांनी ही सुचना केली.
बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले, “शैक्षणिक संस्थांमध्ये अपेक्षित दर्जा आणि शिक्षणाचा दर्जा सुनिश्चित करण्यासाठी शिक्षकांची भरती अत्यंत महत्त्वाची आहे.
म्हणूनच, मी संबंधित अधिकाऱ्यांना सर्व शिक्षक भरतीचा अनुषेश भरून काढण्याची सुचना केली आहे. विद्यापीठातील विद्यार्थ्यांना लॅपटॉप आणि टॅब्लेटचे वाटप आणि पीएच.डी. विद्यार्थ्यांना स्टायपेंड देण्यावरही या बैठकीत चर्चा झाली.
म्हैसूर महाराणी कला महाविद्यालयाच्या वसतिगृह परिसरात कला आणि विज्ञान शाखेतील प्रत्येकी एक हजार विद्यार्थिनींना राहण्यासाठी वसतिगृहाच्या बांधकामाला गती देण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार हे वसतिगृह 99 कोटी रुपये खर्चून उभारले जात आहे. त्यासाठी विभागाकडे 47 कोटी रुपये उपलब्ध असल्याची माहिती देऊन मुख्यमंत्री म्हणाले की,
पुढील वर्षीच्या अर्थसंकल्पात अतिरिक्त अनुदान देण्यासाठी निधी राखून ठेवण्याचे निर्देश त्यांनी वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. प्रस्ताव अगोदरच सादर करावेत, अशी सूचना त्यांनी केली. राज्यातील 16 अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या नुतनीकरणाची सुचनाहीं त्यांनी दिली.