वाहतूक पोलिसाच्या नेमणुकीसाठी आमदारांचा विधानसभेत तारांकित प्रश्‍न

नेवासाफाटा – कुकाण्यात (ता.नेवासा) वाहतूक पोलीस नसल्याने अनेकदा अवैध वाहतूक व वाहतूक कोंडीचा सामना कुकाणावासीयांना करावा लागत होता. गेली तीन ते चार वर्षापासून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना मागणी करूनही 20 हजार लोकसंख्येच्या या गावात वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी ही मागणी जोर धरत होती. मात्र यासाठी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी कुकाण्यात वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी यासाठी विधानसभेतच तारांकित प्रश्‍न उपस्थित केला.

कुकाणा बाजारपेठेचा हा मुख्य वर्दळीचा रस्ता आहे. तसेच श्रीरामपूर ते शेवगाव हा राज्यमार्ग आहे. येथे गेल्या काही महिन्यांपासून वाहतूक पोलीस नसल्याने नेहमी वाहतूक कोंडी होते. बाजार पेठे जवळपास अवैध वाहतूक मोठी डोकेदुखी ठरत आहे. तसेच खासगी वाहनचालक वाहने रस्त्यावरच उभी करून आपल्या वाहनांमध्ये प्रवासी बसवतात. याचा त्रास नागरिकांना सहन करवा लागत होता.

नेवासाचे पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांनी गावातील काही प्रतिष्ठित नागरिकांच्या मदतीने रोडवरील काही अंतरावर साईट पट्ट्या मारून वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यासाठी प्रयत्न केले होते. आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्‍न मार्गी लावल्याने त्यांना नागरिक धन्यवाद देत आहेत, असे आबासाहेब कर्डिले यांनी सांगितले.

कुकाण्यात वाहतूक पोलिसांची नेमणूक करण्यात आली आहे. तेथील नागरिकांनी व वाहतूकदारांनी आमच्या कर्मचाऱ्यांस सहकार्य करावे.
रणजित डेरे, नेवासा पोलीस निरीक्षक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)