मुंबई – बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतने 14 जून रोजी मुंबईतील आपल्या राहत्या घरी गळफास लावून या आत्महत्या केली. त्याचे निधन जितके दुःखदायक होते, तितकेच ते धक्कादायकही होते. सुशांतच्या फॅन्स च्या मते ही आत्महत्या नसून इंडस्ट्री मधील लोकांच्या दबावाखाली येऊन झालेला खून आहे असे म्हंटले जातेय. अद्याप सुशांतने आत्महत्या नेमकी का केली याचा तपास पोलीस करत आहेत.
दरम्यान, आता सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीच्या मुंबईतील घरावर छापा टाकला आहे. या प्रकरणातील ड्रग अँगल समोर आल्यानंतर एनसीबीकडून वेगाने तपास सुरु आहे. आज सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास एनसीबीची टीम रियाच्या घरी दाखल झाली आहे.
Maharashtra: Officers of Narcotics Control Bureau (NCB) reach the residence of #RheaChakraborty in Mumbai. An officer (in pic 4) says, “It’s just a procedural matter. That is what we are following. It is being done at Rhea’s and Samuel Miranda’s house.” https://t.co/2qMW4jyDqK pic.twitter.com/307I6bqZCn
— ANI (@ANI) September 4, 2020
रिया आणि तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती ड्रग्ज प्रकरणी हा छापा टाकण्यात आला असून एनसीबीच्या पाच सदस्यांकडून झाडाझडती सुरु आहे. यावेळी मुंबई पोलीसही एनसीबी टीमसोबत रियाच्या घरी पोहोचले आहेत. तसेच, एनसीबीची दुसरी टीम सुशांतचा मॅनेजर सॅम्युएल मिरांडाच्या घरी पोहोचली आहे.
Maharashtra: Narcotics Control Bureau (NCB) team reaches #RheaChakraborty‘s residence in Mumbai. pic.twitter.com/P6ciwWT4Sr
— ANI (@ANI) September 4, 2020
सुशांतच्या मृत्यू प्रकरणा बाबत चौकशी करताना रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती यांचे ड्रग्ज तस्करांशी संबंध असल्याचं समोर आलं होतं. या प्रकरणाशी संबंधित अनेक ड्रग्ज तस्करांना अटकही करण्यात आली. याचपार्शभूमीवर आज सकाळी अधिक तपास करण्यासाठी एनसीबीचं एक पथक रिया चक्रवर्तीच्या घरी दाखल झालं आहे.
दरम्यान, आता एनसीबीने केलेल्या या कारवाईनंतर रिया चक्रवर्तीला सुशांत सिंह मृत्यू प्रकरणातील ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी अटक होणार का? अशा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित केला जात आहे.