SSC Exam Cancelled | 10वीची परीक्षा रद्द; कसा लागणार निकाल?, शिक्षणमंत्र्यांनी दिली माहिती

मुंबई – राज्यातील वाढत्या करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने इयत्ता दहावीची परीक्षा रद्द करण्याचा आणि बारावीची परिक्षा मे महिन्याअखेर घेण्याचा निर्णय घेतला आहे.

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आपल्या अधिकृत ट्विटरवरून यासंदर्भात माहिती दिली आहे. तसेच निकाल कसा लागणार यासंदर्भातही माहिती देण्यात आली आहे.

“दहावीचा निकाल कोणत्या आधारावर दिला जाईल यासाठी निकष व निकालाच्या घोषणेची तारीख लवकरच जाहीर केली जाईल. शालेय शिक्षण विभाग निष्पक्ष आणि अचूक मूल्यांकन निकष तयार करण्यासाठी वचनबद्ध आहे.” असं त्यांनी सांगितलं.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.