बॉलीवूडमध्ये अनेक स्टारकिड्सने यशस्वीपणे डेब्यू केले असून आणखी काही स्टारकिड्स डेब्यू करण्यास सज्ज आहेत. श्रीदेवी आणि बोनी कपूरची मुलगी जान्हवी कपूरने चित्रपटसृष्टीत स्वतःची ओळख निर्माण केली आहे. आता तिची छोटी बहिण खुशी कपूर बॉलीवूडमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहे.
View this post on Instagram
बॉलीवूडमध्ये एंट्री करण्यास खुशी कपूरने तयारी केली असून याबाबत खुद्द बोनी कपूर यांनी पुष्टि दिली आहे. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले की, सध्या खुशी लॉस अंजेलिस येथे अभिनयाचे धडे गिरवित आहे. तेथून परतल्यावर ती लवकरच मोठया पडद्यावर काम करण्यास तयार होईल. बोनी कपूर म्हणाले, खुशी सर्वांची लाडकी आहे.
View this post on Instagram
ती घरात सर्वात छोटी असल्याने मी तिच्याबाबत खूपच प्रोटेक्टिव्ह आहे. तसे मी माझ्या सर्व मुलांवर प्रेम करतो, परंतु खुशीशी एक वेगळीच जवळीकता आहे. खुशीने लॉकडाउनपूर्वी अमेरिकेत एक कोर्स पूर्ण केला होता. त्यानंतर आता ती लॉस अँजेलिस येथे पुढील शिक्षणासाठी गेली आहे. दरम्यान, खुशी कपूर पूर्ण तयारीनीशी मैदानात उतरू इच्छित आहे.
View this post on Instagram
तिने चुलत बहिण शनाया कपूरसोबत कथकचे धडे गिरविले आहे. कथक करतानाचे तिचे काही फोटो सोशल मीडियावरदेखील व्हायरल झाले होते. दुसरीकडे करण जोहरसह अनेक दिग्गज चित्रपट निर्मात्यांनी खुशीला चित्रपटासाठी ऑफरदेखील दिलेली आहे.