कोलोंबो, (श्रीलंका) – अमली पदार्थांच्या तस्करीला रोखण्यासाठी करण्यात येणार् या उपाय योजनांसंदर्भात संयुक्त राष्ट्राच्या मानवी हक्कविषयक संस्थेने केलेला दावा श्रीलंकेने फेटाळून लावला आहे. ऑपरेशन युक्तिया असे नाव असलेल्या वादग्रस्त मोहिमेअंतर्गत श्रीलंकेत अमली पदार्थांच्या तस्करीचे मोठे रॅकेट उद्ध्वस्त करण्यात आल्याचा दावा संयुक्त राष्ट्राच्या या संस्थेने केला होता. मात्र श्रीलंकेने या दाव्याला आक्षेप घेताना आणि या कारवाईचे पुरावे देण्याचे आवाहन केले आहे.
श्रीलंकेचे सार्वजनिक सुरक्षा विषयाचे मंत्री तिरान ऍलेस यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना देशातील अमली पदार्थांच्या वापराला आळा घालण्याबाबतची सरकारची कटिबद्धता बोलून दाखवली. संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार विषयक उच्चायुक्त वोल्कर तुर्क यांनी १२ जानेवारीला एक निवेदन प्रसिद्ध करून ऑपरेशन युक्तियाची माहिती दिली होती.
ही मोहिम गेल्या वर्षी १७ डिसेंबरला सुरू करण्यात आली असून देशातील अमली पदार्थांची समस्या संपण्यासाठी ३० जून पर्यंतची मुदत निश्चित करण्यात आल्याचे या निवेदनात म्हटले होते. या कालावधीत ड्रग्जशी संबंधित सर्वांना अटक केली जाण्याचे उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी म्हटले होते. १७ डिसेंबरपासून तब्बल २९ हजार लोकांना अंमली पदार्थांशी संबंधित प्रकरणांमध्ये अटक करण्यात आली आहे,
काहींवर गैरवर्तन आणि छळ केल्याचा आरोप आहे, असे तुर्क यांनी सांगितले होते. मात्र संयुक्त राष्ट्राने ड्रग्जबाबत श्रीलंकेच्या सरकारला सागायला हवे होते. थेट निवेदन प्रसिद्धीसद्यायला नको होते. संयुक्त राष्ट्राने जरी थेट निवेदन प्रसिद्धीस दिले, तरी श्रीलंका ही कारवाई थांबवणार नाही, असे मंत्री ऍलेस यांनी म्हटले आहे.