#CWC19 : श्रीलंकेचा इंग्लंडला दणका

मॅथ्युज नाबाद 85, मलिंगाचे चार बळी

लंडन – अँजेलो मॅथ्युजने विजयाचा पाया रचल्यानंतर लसिथ मलिंगाने चार विकेट्‌स घेत श्रीलंकेच्या विजयावर कळस चढविला, त्यामुळेच आपण सहज सामना जिंकू अशी फुशारकी मारणाऱ्या इंग्लंडला 20 धावांनी पराभवाचा दणका बसला. विजयासाठी 233 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा डाव 47 षटकात 212 धावांत आटोपला.

अनुभवी फलंदाजांचा समावेश असलेल्या इंग्लंडसाठी माफक आव्हान होते. मात्र मलिंगा (4-43), इसरू उडाना (2-41) व धनंजय डीसिल्वा (3-32) यांच्या अचूक माऱ्यापुढे इंग्लंडच्या फलंदाजांनी हाराकिरी केली. जो रूट (57) व इऑन मॉर्गन (21) यांनी मधल्या फळीत केलेले प्रयत्न अपेक्षेइतका धावांचा वेग ठेवू शकले नाहीत. बेन स्टोक्‍स (नाबाद 82) याने शेवटच्या षटकांमध्ये आक्रमक टोलेबाजी केली. तथापि त्याची खेळीही पराभव टाळण्यासाठी अपुरी ठरली.

तत्पूर्वी श्रीलंकेचा कर्णधार दिमुथ करूणारत्ने याने टाॅस जिकूंन प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. श्रीलंकेने 50 षटकांत 9 बाद 232 धावा केल्या. यामध्ये अँजेलो मॅथ्यूजने 115 चेंडूत 5 चौकार आणि 1 षटकारांसह 85 धावा केल्या.

संक्षिप्त धावफलक :

श्रीलंका – 50 षटकात 9 बाद 232 (अँजेलो मॅथ्युज नाबाद 85, आविष्का फर्नान्डो 49, कुशल मेंडीस 46, जोफ्रा आर्चर 3-52, मार्क वुड 3-40, आदिल रशीद 2-45) .

इंग्लंड – 47 षटकात सर्वबाद 212 (बेन स्टोक्‍स नाबाद 82, जो रूट 57, लसिथ मलिंगा 4-43, इसरू उडाना 2-41, धनंजय डीसिल्वा 3-32)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)