शिक्रापूर- करोना रोगाने थैमान घातले असून राज्यात करोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढच होत असताना सर्वत्र निर्जंतुक औषध फवारणी करण्यात येत आहे. शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे दररोज निर्जंतुकीकरणासाठी औषध फवारणी करण्यात येत आहे.
येथील ग्रामपंचायतीच्या वतीने गावात सर्व वाड्या- वस्त्या, सोसायटी तसेच मंदिरे, ग्रामीण रुग्णालय, शाळा, आदी परिसरात औषध फवारणी करीत गाव निर्जंतुक करण्यात येत आहे. पोलीस प्रशासन त्यासाठी मोठे प्रयत्न करीत नागरिकांमध्ये जनजागृती करीत आहे. ग्रामपंचायतीतर्फे स्पीकरद्वारे गावात जनजागृती करण्यात येत आहे. पोलीस स्टेशन येथे दररोज ट्रॅक्टरच्या साहाय्याने जंतुनाशक औषध फवारणी करण्यात येत आहे.