पीएमडीटीए ज्युनियर टेनिस लीग स्पर्धा : विपार स्पिडिंग चिताज संघाचा संघर्षपूर्ण विजय

पुणे – विपार स्पिडिंग चिताज संघाने फ्लाईंग हॉक्‍स संघाचा 44-42 असा संघर्षपूर्ण पराभव केला आणि पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे आयोजित केलेल्या पीएमडीटीए ज्युनियर टेनिस लीग स्पर्धेत विजयी सलामी केली.

डेक्कन जिमखाना व पीवायसी हिंदू जिमखाना टेनिस कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीच्या चुरशीच्या झालेल्या लढतीत पहिल्या 8 वर्षाखालील मिश्र गटात विपार स्पिडिंग चिताजच्या नमिश हूड याने फ्लाईंग हॉक्‍सच्या अंशूल पुजारी याचा 4-1 असा पराभव केला तर 10 वर्षाखालील मुलांच्या गटात विपार स्पिडिंग चिताजच्या नीरज जोर्वेकर याला फ्लाईंग हॉक्‍सच्या सक्षम भन्साळीने 4-0 असे पराभूत करून संघाला बरोबरी साधून दिली. 10 वर्षाखालील मुलींच्या गटात विपार स्पिडिंग चिताजच्या ध्रुवी आदयंता हिने किया तेलंगला 4-1 असे पराभूत केले. त्यानंतर12वर्षाखालील मुलांच्या गटात फ्लाईंग हॉक्‍सच्या तेज ओकने अर्चित धूतवर 6-4 असा विजय मिळवला.

12वर्षाखालील मुलींच्या गटात विपार स्पिडिंग चिताजच्या सलोनी परिदा हिने अंजली निंबाळकरचा 6-3 असा तर 14 वर्षाखालील मुलांच्या गटात ईशान देगमवारने फ्लाईंग हॉक्‍सच्या पार्थ देवरूखकरचा 6-1 असा पराभव करून संघाला आघाडी मिळवून दिली. पण ही आघाडी विपार स्पिडिंग चिताज संघाला फार वेळ टिकविता आली नाही. 14 वर्षाखालील मुलींच्या गटात फ्लाईंग हॉक्‍सच्या श्रावणी देशमुखने अलिना शेख हिचा 6-3 असा तर, कुमार दुहेरी गटात अर्जुन किर्तने व तनिश बेलगळकर यांनी विपार स्पिडिंग चिताजच्या कृष्णा घुवलेवाला व वेदांग काळे यांचा 6-3असा पराभव करून संघाचे आव्हान कायम राखले.

त्यानंतर 14वर्षाखालील मुलांच्या दुहेरी गटात फ्लाईंग हॉक्‍सच्या सुधांशू सावंत व श्‍लोक गांधी या जोडीने ऐतरेत्या राव व केयूर म्हेत्रे यांचा 6-4असा पराभव करून आघाडी वाढवली. पण उर्वरित दोन सामन्यात 10 वर्षाखालील मुलांच्या दुहेरीत चिताजच्या रियान माळीने वेद मोघेच्या साथीत .नीव कोठारी व रोहन बजाज यांचा टायब्रेकमध्ये 4-3(6) असा तर, मिश्र दुहेरीत विपार स्पिडिंग चिताजच्या नाव्या भामिदिप्ती व विश्वजीत सणस यांनी कौशिकी समंथा व अवनीश गवळी यांचा 6-5(5) असा पराभव करून संघाचा विजय सुकर केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)