पिंपरी – दुचाकीवरुन आलेल्या दोन चोरट्यांनी एका तरुणाला चाकूचा धाक दाखवून मोबाईल हिसकावून नेला. ही घटना बुधवार दि. 19 जून रोजी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास फुले नगर येथील डी.वाय पाटील रुग्णालयाच्या मागील गेटसमोरील रस्त्यावर घडली.
याप्रकरणी वैभव रमेश महाजन (वय-26 रा. संतोषीमाता मंदीराजवळ, नेहरुनगर) यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी वैभव हे आपल्या कामावर जात असताना डी.वाय पाटील हॉस्पिटलच्या मागील गेटसमोर आल्यानंतर दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी त्यांना थांबवले व चाकूचा धाक दाखवून त्यांच्याजवळील 12 हजार रुपये किंमतीचा मोबाईल हिसकावून नेला.