सद्‌भावना क्रिकेट स्पर्धेत स्मॅशर्स संघास विजेतेपद

पुणे – ऑक्‍झिरीच स्मॅशर्स संघाने महिलांच्या सद्‌भावना करंडक क्रिकेट स्पर्धेत अजिंक्‍यपद पटकाविले. त्यांनी अंतिम सामन्यात पुणे जिल्हा क्रिकेट संघटना (पीडीसीए) संघाचा नऊ गडी राखून पराभब केला. ही स्पर्धा वसंतदादा सेवा संस्थेतर्फे आयोजित करण्यात आली होती.

नेहरू स्टेडियमवर या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. अंतिम सामन्यात ऑक्‍झिरीच स्मॅशर्स संघाने निर्विवाद वर्चस्व गाजविले. नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण घेतले. स्मॅशर्स संघाच्या अचूक गोलंदाजीपुढे पीडीसीए संघाचा डाव 8 षटकांत 4 बाद 64 धावांवर रोखला गेला. त्यांच्याकडून पूनम खेमनार हिने झुंजार खेळ करीत चार चौकारांसह 42 धावा केल्या. तिला अन्य सहकाऱ्यांकडून साथ मिळाली नाही.

स्मॅशर्स संघाची सलामीची फलंदाज रोहिणी माने ही केवळ एक धाव काढून बाद झाली. परंतु गौतमी नाईक व पूजा निमावत यांनी 35 मिनिटात 6.2 षटकात 64 धावांची अखंडित भागीदारी केली आणि संघाच्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. नाईक हिने नाबाद 28 धावा केल्या तर निमावत हिने नाबाद 22 धावा केल्या. निमावत हिला अंतिम सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मान मिळाला.

संक्षिप्त धावफलक

पीडीसीए- 8 षटकात 4 बाद 64 (पूनम खेमनार 42, गौतमी नाईक 2-1)
स्मॅशर्स 6.2 षटकात 1 बाद 65 (गौतमी नाईक नाबाद 28, पूजा निमावत नाबाद 22, प्रियांका कुंभार 1-7)

Leave A Reply

Your email address will not be published.