पुलवामात दहशतवाद्यांकडून पोलिस ठाण्यावर ग्रेनेड हल्ला

जम्मू काश्मीर – जम्मू-काश्मीर येथे गेल्या काही दिवसांपासून दहशतवादी कारवायांनी पुन्हा एकदा जोर धरला असल्याचे चित्र असतानाच आज त्यामध्ये आणखीन एका दहशतवादी कारवाईची भर पडली.

एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार जम्मू काश्मीर येथील पुलवामा येथे आज दहशतवाद्यांनी येथील पोलिस ठाण्यावर ग्रेनेड हल्ला केला आहे. दहशतवाद्यांनी पोलीस ठाण्याच्या दिशेने टाकलेले ग्रेनेड पोलीस ठाण्याच्या बाहेरील बाजूस पडले. दहशतवाद्यांनी केलेल्या या हल्ल्यामध्ये पोलीस ठाण्याबाहेर थांबलेल्या काही सामान्य नागरिकांना दुखापती झाल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.