क्रिकेट स्पर्धा : किरण अकादमी, जस अकादमी यांच्यात विजेतेपदासाठी लढत

जस क्रिकेट अकादमी करंडक टी-20 प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धा

पुणे – उपांत्य फेरीत जस क्रिकेट अकादमी (अमनोरा) आणि किरण क्रिकेट अकादमी या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून युनायटेड स्पोर्टस क्‍लब आणि जस क्रिकेट अकादमी यांच्या तर्फे आयोजित जस क्रिकेट अकादमी करंडक 14 वर्षांखालील निमंत्रित टी-20 प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. आता अंतिम फेरीत विजेतेपदासाठी हे दोन्ही संघ समोरासमोर असणार आहेत.

धानोरी येथील प्रकाश टिंगरे मैदानावर झालेल्या स्पर्धेत उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात माहीर रावळ (27धावा व 2-10) याने केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर जस क्रिकेट अकादमी (अमानोरा) संघाने जस क्रिकेट अकादमी (धानोरी) संघावर 43 धावांनी विजय मिळविला. प्रथम फलंदाजी करताना शवन 38, माहीर रावळ 27, श्रेयश यादव 17, समर्थ वाबळे नाबाद 15 यांनी केलेल्या धावांच्या जोरावर जस क्रिकेट अकादमी (अमानोरा) संघाने 20 षटकांत 7 बाद 144 धावा केल्या. प्रत्युत्तरात जस क्रिकेट अकादमी (धानोरी) संघाचा डाव 19.2 षटकांत 101 धावांवर संपुष्टात आला.

यात आलोक बोबडे नाबाद 28, इधांत टिको 15, उबेद भट 10 यांनी दिलेली लढत अपुरी ठरली. जस क्रिकेट अकादमी (अमानोरा) संघाकडून तनिश बागाने (3-24), माहीर रावळ (2-10), सौमिल दाभोलकर (2-16), समर्थ वाबळे (1-17), हिमांशू अगरवाल (1-20) यांनी सुरेख गोलंदाजी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. अष्टपैलू कामगिरी करणारा माहीर रावळ हा सामन्याचा मानकरी ठरला.

दुसऱ्या सामन्यात अथर्व पाटील याने केलेल्या नाबाद 42 धावांच्या खेळीच्या जोरावर किरण क्रिकेट अकादमी संघाने स्पार्क स्पोर्टस अकादमी 10 गडी राखून विजय मिळवत दिमाखात अंतिम फेरीत धडक मारली. प्रथम फलंदाजी करताना स्पार्क स्पोर्टस्‌ अकादमीचा डाव 18.2 षटकांत नाममात्र 58 धावांवर गुंडाळला.

सविस्तर निकाल : उपांत्य फेरी:

जस क्रिकेट अकादमी (अमानोरा) : 20 षटकांत 7 बाद 144 (शवन 38, माहीर रावळ 27, श्रेयश यादव 17, समर्थ वाबळे नाबाद 15, नवशिष्ट गिरी 1-26, आलोक बोबडे 1-27, साहिल भोसले 1-21, इधांत टिको 1-21, अनुज पाटील 1-21) वि.वि. जस क्रिकेट अकादमी (धानोरी): 19.2 षटकांत सर्वबाद 101 (आलोक बोबडे नाबाद 28, इधांत टिको 15, उबेद भट 10, तनिश बागाने 3-24, माहीर रावळ 2-10, सौमिल दाभोलकर 2-16, समर्थ वाबळे 1-17, हिमांशू अगरवाल 1-20); सामनावीर-माहीर रावळ;

स्पार्क स्पोर्टस अकादमी : 18.2 षटकांत सर्वबाद 58 (अर्णव पुरोहित 21, ओम श्रीभाते 3-9, राणा सरनोबत 3-7, वरद पाटील 2-16, आयुष्‌ अनुशे 1-10) पराभूत वि. किरण क्रिकेट अकादमी: 6.3 षटकांत बिनबाद 60 (अथर्व पाटील नाबाद 42, हिमांशू चौगुले नाबाद 14);सामनावीर-अथर्व पाटील.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.