मुंबईत रंगणार अजमेरा इंडीकार्टीग सिरीज

500 हुन अधिक रेसर्स नोंदवणार सहभाग

मुंबई – अजमेरा इंडीकार्टीग सिरीज रविवारी मुंबईत होणार असून 500 हुन अधिक रेसर्स यामध्ये सहभाग नोंदवणार आहेत. यासोबतच अनेक राष्ट्रीय चॅम्पियन्स आणि आंतरराष्ट्रीय अनुभव असणारे रेसर्स देखील आकर्षणाचा केंद्र असतील.
काश्‍मिर, नाशिक, केरळ, गुजरात, हरयाणा, जळगाव आणि विजयवाडा या ठिकाणाहून अनेक युवा रेसर्सने शुक्रवारी व शनिवारी झालेल्या पात्रता फेरीत सहभाग नोंदवला होता. आता ते वडाळा येथील अजमेरा इंडीकार्टीग सर्किटच्या ग्रॅंडफिनालेत चमक दाखवण्यासाठी सज्ज असतील.

इंडीकार्टीग हे देशातील सर्वात मोठी कार्टीग सिरीज आहे. किंग ऑफ कार्टीग म्हणून ओळख असलेले रायोमंड बानाजी हे एफएमएससीआयच्या मान्यतेखाली याचे आयोजन करत असतात. ग्रासरुट स्तरावर मोटर स्पोर्टसचा प्रसार व्हावा आणि ड्रायव्हर्सना चांगले व्यासपीठ मिळावे हा या मागचा उद्देश आहे. या लोकप्रिय सिरीजमध्ये रेसर्स प्रो विभागातील तीन वेगवेगळ्या वयोगटात सहभागी होतील. यासोबत कमी अनुभव व अनुभव नसलेल्या रेसर्स देखील आंतर शालेय, आंतर महाविद्यालय किंवा कॉर्पोरेट, अमॅच्युअर आणि मास्टर्स (30 वर्ष आणि त्याहून अधिक )सहभाग नोंदवू शकतात.

महिलांसाठी एक विशेष गटवारी असणार आहे. त्यामुळे मुली व महिला यामध्ये सहभागी होऊ शकतील. मोटरस्पोर्टसमध्ये महिला व पुरुष एकमेकांविरुद्ध स्पर्धा करू शकतात. मुंबईमध्ये 10 वर्षांनी पहिल्यांदाच स्पर्धात्मक रेसिंग पाहण्याची संधी मिळणार आहे. या स्पर्धेसाठी मोठ्या संख्येने स्पर्धकांनी नोंदणी केली आहे. सर्व गटातील अंतिम फेरी रविवारी संध्याकाळी 3 ते 7 दरम्यान पार पडणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.