पुणे – जोशी स्पोर्ट्स तर्फे दुसर्या ‘व्हिजन प्रिमिअर लीग’ अजिंक्यपद २५-२५ षटकांच्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. १२ ते १६ वयोगटातील युवा खेळाडूंसाठी आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा १६ ते २५ जानेवारी २०२४ या कालावधीत व्हिजन क्रिकेट अॅकॅडमी मैदान, सनसिटी रोड येथे होणार आहे.
व्हिजन क्रिकेट अॅकॅडमीमधील १२ ते १६ वयोगटातील खेळाडुंसाठी आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत एकूण ५ संघ सहभागी झाले आहेत. खेळाडूंना स्पर्धात्मक सामन्यांचा अनुभव मिळावा तसेच खेळाडूंच्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य तसेच समृध्दी वृद्धींगत व्हावी या हेतूने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
साखळी आणि बाद फेरीमध्ये होणार्या या टी-२० स्पर्धेत जॅग्वॉर्स इलेव्हन, लिंक्सेस् इलेव्हन, लायन्स् इलेव्हन, लेपर्डस् इलेव्हन, टायगर्स इलेव्हन संघांमध्ये विजेतेपदाची चुरस पहावयास मिळणार आहे. व्हाईट बॉलमध्ये होणार्या या स्पर्धेत २० साखळी सामने होणार आहेत. स्पर्धेचा उपांत्य फेरीचे सामने २४ जानेवारी रोजी तर, अंतिम सामना २५ जानेवारी रोजी होणार आहे.