पुणे – चॅम्प्स स्पोर्टस फाऊंडेशन यांच्या वतीने आयोजित चॅम्प्स करंडक १२ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत ब गटात बार्शी तालुका क्रिकेट अकादमी (बीटीसीए)संघाने विजयी सलामी दिली.
धायरी येथील डीएसके विश्व क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत कृष्णराज देशमुख(२-२३) याने केलेल्या सुरेख गोलंदाजीसह शिवम गायकवाड(५०धावा) याने केलेल्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर बीटीसीए संघाने एमजे साई स्पोर्टसचा ८ गडी राखून पराभव केला.
निकाल: साखळी फेरी:
एमजे साई स्पोर्टस: २५ षटकात ५ बाद ११२ (अथर्व मांडवकर ४९, युग जाधव ११; कृष्णराज देशमुख २-२३, समर्थ सावळे १-२०) पराभूत वि. बीटीसीए: २१.१ षटकात ३ बाद ११५ (शिवम गायकवाड ५०, अथर्व आंधारे १८, युग जाधव १-६, आयुश मांडवकर १-१६); सामनावीर – कृष्णराज देशमुख