पुणे :- गेले काही दिवस विभागीय स्तरावर सुरु असणारी क्रेडाई महाराष्ट्र प्रीमियर लीग ही स्पर्धा आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचली आहे. २२ संघातून स्वतःला सिद्ध करत पुढे आलेल्या छ. संभाजीनगर आणि कोल्हापूर या दोन संघात आज(दि.२६) अखेरचा सामना डेक्कन जिमखाना मैदान येथे सकाळी ९ ते ११ या वेळेत रंगणार आहे.
राज्यभरातील बांधकाम व्यावसायिकांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली असून क्रेडाई महाराष्ट्र प्रीमियर लीगचा पहिला मानकरी कोण? याकडे आता सर्वांचे लक्ष वेधले आहे. राज्यभरातील एकूण ८ संघात काल या स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी पार पडली.
यातून विजयी झालेल्या एकूण ४ संघात आज उपांत्य फेरीचे सामने झाले. फलदांजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण यावर आपली पकड दाखवत छ. संभाजीनगर आणि कोल्हापूर हे संघ अंतिम फेरीत दाखल झाले.
MSLTA Men’s ITF Tennis Tournament : दुहेरीत पुरव राजा-रामकुमारनं पटकावलं विजेतेपद…
शनिवारी झालेल्या उपांत्य फेरीच्या पहिल्या लढतीत छ. संभाजीनगरने नांदेड संघाचा पराभव केला. तर कोल्हापूर आणि नागपूर यांच्यातील दुसऱ्या उपांत्य लढतीत कोल्हापूरने बाजी मारली.