चिंबळी – कुरुळी (ता. खेड) येथील आनंद इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीने यंदा स्नेहसंमेलनाला फाटा देत शालेय क्रीडा महोत्सव अर्थात “फिट इन इंडिया’ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. इयत्ता 8 पासून ते 10 वी पर्यंताच्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता.
“फिट इन इंडिया’ महोत्सवाचा शुभारंभ गजानन मंकिकर, आनंद इग्लिंग मेडियम स्कूलचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अनिल काळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आला. यात लेझीम, खो-खो, रनिंग, रिले, लांब उडी, कबड्डी, क्रिकेट, व्हॉलीबॉल, फुटबॉल, सॉफ्टबॉल, योगासनाचे विविध प्रकारच्या स्पर्धा यावेळी रंगल्या होत्या.
क्रीडेचे व शालेय जीवनामध्ये क्रीडा स्पर्धा व योगा अभ्यासाला ही महत्त्व आहे, असे शाळेतील विद्यार्थ्यांना मान्यवरांनी पटवून देत या विषयांमध्ये प्रशिक्षण देण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना राष्ट्रीय पातळीपर्यंत आपले व शाळेचे नाव उज्ज्वल करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यात आले.
या विविध स्पर्धेत घवघवीतपणे यश मिळालेल्या विद्यार्थ्यांना सामाजिक शिक्षण अधिकारी भाऊसाहेब कारेकर, प्रसाद बुकरे, आनंद फाउंडेशनचे अध्यक्ष गजानन मंकिकर, डॉ. अनिल काळे, मुख्याध्यापिका सरला सोनवणे, पोलीस पाटील प्रतिभा काबंळे यांच्या हस्ते सन्मानचिन, प्रशिस्तीपत्रक, पदक देऊन देऊन गौरवण्यात आले.
शाळेच्या उन्नतीमध्ये बदल केला असून विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सवलतीबाब माहिती डॉ. काळे यांनी यावेळी दिली. तर विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर खेळाकडे सुद्धा लक्ष दिले पाहिजे तसेच बौद्धिक विकासाबरोबर शारिरीक विकास पण विद्यार्थ्यांचा झाला पाहिजे या विषयावर कारेकर यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी सरपंच, उपसरपंच सर्व सदस्य, पालक व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.