वालचंदनगर – कळंब येथील फडतरे नॉलेज सीटीच्या श्री व्यंकटेश्वरा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले. यावेळी बालिकादिनाची प्रतिज्ञा घेण्यात आली.
यावेळी मुख्याध्यापिका आरती कदम यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी कदम यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्याचा परिचय करून दिला. यावेळी उपमुखाध्यापिका अनिता भाटिया, विविध संस्थांचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षिका, कर्मचारी, विद्यार्थी आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.