पिंपरी – बक्षीसपत्र, मालमत्ता हस्तांतरण कसे करावे, पत्ता बदलण्यासाठी काय करावे, मालमत्ता सर्व्हेक्षण कधी सुरू होणार, महिला मिळकत धारकांसाठी काय सवलत आहे, यासह मालमत्ता धारकांच्या विविध प्रश्नांच्या शंकाचे निरंसन पहिल्याच करसंवादमध्ये महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाच्या अधिकाऱ्यांनी केले. पहिल्याच करसंवादला मालमत्ता धारकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याची माहिती सहाय्यक आयुक्त निलेश देशमुख यांनी दिली.
पिंपरी-चिंचवड शहरात 5 लाख 77 हजार मिळकतींची नोंदणी आहे. या सर्व मिळकतींना महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागामार्फत कर गोळा केला जातो. करदात्यांचे विविध प्रश्न, त्यांना करासंदर्भात येणाऱ्या अडचणी, मनातील शंकांची सोडवणूक करण्यासाठी जनसंवाद सभेच्या धर्तीवर ऑनलाइन पध्दतीने करसंवादचे आयोजन करण्यास सुरूवात करण्यात आली आहे.
त्यानुसार हा करसंवाद शनिवार (दि.23) सकाळी 11 वाजता फेसबुक, युट्यूबच्या माध्यमातून पार पडला. या करसंवादमध्ये सहाय्यक आयुक्त देशमुख यांच्यासह प्रशासन अधिकारी नाना मोरे, महेंद्र चौधरी, कार्यालयीन अधिक्षक चंद्रकांत विरणक, सर्व मंडलाधिकारी, टेक-9 चे सुधिर बोऱ्हाडे उपस्थित होते.
पहिल्याच करसंवादमध्ये 100 पेक्षा जास्त नागरिकांनी सहभाग घेतला. 40 नागरिकांनी ऑनलाइन प्रश्न विचारले. तर 8 मालमत्ताधारक प्रत्यक्षात महापालिकेत येऊन ऑफलाइन सहभागी झाले होते. यामध्ये 6 ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग होता. यावेळी अनेकांचे प्रश्न तत्काळ मार्गी लावण्यात आले.
कर संकलन विभागाचे नवनवीन प्रयोग
कर आकारणी व करसंलन विभागाचे सहाय्यक आयुक्त निलेश देशमुख म्हणाले, वारसांची नावे लावण्याची प्रक्रिया काय आहे, बक्षीसपत्र, मालमत्ता हस्तांतरण कसे करावे,