पुणे – प्रवाशांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर रेल्वेकडून पुणे-दानापूर मार्गावर विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहे. उत्तर आणि पूर्वेकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असल्याने विशेष गाड्यात वाढ केली आहे.
विशेष रेल्वे नं. 01493 पुणे-दानापूर एक्स्प्रेस दर बुधवारी (12 मे) रोजी रवाना होणार असून, ती शुक्रवारी (14 मे) रोजी पोहचेल. तर दानापूर-पुणे एक्स्प्रेस शुक्रवारी सुटून पुणे येथे शनिवारी (15 मे) दाखल होईल. ही रेल्वे दौंड कॉर्डलाइन, नगर, मनमाड, भुसावळ, जबलपूर, कटनी आदी स्थानकांवर थांबणार आहे.