मुंबई – बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचे चाहते ज्या क्षणाची प्रतीक्षा करत होते तो क्षण आता आला आहे. ‘जवान’चा ट्रेलर रिलीज झाला आहे. शाहरुखच्या ‘जवान’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होताच सोशल मीडियावर लोकप्रिय झाला. शाहरुख खान ‘जवान’ म्हणून खूप दमदार दिसत आहे. ट्रेलरमध्ये एकाच वेळी अनेक फ्लेवर्स पाहायला मिळत आहेत. शाहरुखच्या पठाणनंतर चाहते जवानची वाट पाहत होते.
नयनतारा ‘जवान’मध्ये शाहरुखसोबत आहे. या चित्रपटातून नयनतारा बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. दीपिका पदुकोणचाही चित्रपटात खास कॅमिओ आहे. टीझरमधील नयनताराची झलक पाहून सर्वांनाच तिचे वेड लागले आहे. साडी परिधान करून दीपिका शत्रूंना धडा शिकवताना दिसते आहे. चित्रपटात विजय विजय सेतुपती खलनायकाच्या भूमिकेत आहे. या चित्रपटाबद्दल किंग खानचे चाहते खूप उत्सुक आहेत. ट्रेलरनंतर जवानाबद्दलची चर्चा आणखी वाढली आहे. शाहरुख खानचा हा चित्रपट हिंदी चित्रपटसृष्टीतील आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडू शकतो, असे मानले जात आहे.
ट्रेलर रिलीज होण्यापूर्वी 30 ऑगस्टच्या संध्याकाळी चेन्नईमध्ये जवानासंदर्भात एक प्री-रिलीज कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता. शाहरुख, ऍटली, विजय सेतुपती, सुनील ग्रोव्हर, रिद्धी डोगरा या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्या कार्यक्रमात शाहरुखानने जिंदा बंदा आणि चेन्नई एक्स्प्रेसच्या 1..2..3..4 गाण्यांवरही डान्स केला. या कार्यक्रमात शाहरुखचे हजारो चाहते उपस्थित होते.