लखनौ – भारत विरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात हेनरिक आणि डेविड मिलर यांनी केलेल्या निर्णायक फलंदाजीच्या मदतीने दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करत 249 धावा लावल्या आहेत. यामुळे आता भारताला विजयासाठी 250 धावा करायच्या आहेत. हा सामना पावसाच्या व्यत्ययामुळे प्रत्येकी 40 षटकांचा करण्यात आला आहे.
Innings Break!
South Africa post 249/4 on the board.
2⃣ wickets for @imShard
1⃣ wicket each for @imkuldeep18 & @bishnoi0056Over to #TeamIndia batters now. 👍 👍
Scorecard ▶️ https://t.co/d65WZUUDh2 #INDvSA | @mastercardindia pic.twitter.com/QjufluMv2y
— BCCI (@BCCI) October 6, 2022
प्रथम फलंदाजी संधी मिळालेल्या दक्षिण आफ्रिकेसाठी जानेमन मलान व क्विंटन डी कॉक यांनी 49 धावांची सलामी दिली. मलान बाद झाल्यानंतर कर्णधार टेंबा बवुमाही फारसा टिकू शकला नाही. ऍडन मार्करम खातेही न खोलता तंबूत परतला. दुसऱ्या बाजूने सलामीवीर डी कॉकने डाव सावरून धरला होता. रवी बिश्नोईच्या गोलंदाजीवर बाद होण्यापूर्वी त्याने 54 चेंडूवर 48 धावांची खेळी केली.
डी कॉक बाद झाल्यानंतर अनुभवी डेव्हिड मिलर आणि हेन्रिक क्लासेन यांनी डावाची सूत्रे हाती घेत भारतीय गोलंदाजांवर प्रतिहल्ला केला. खराब चेंडूंचा समाचार घेत तसेच एकेरी-दुहेरी धावाही काढल्या. त्यांनी नाबाद शतकी भागीदारी रचली. दोघांनी देखील आपापली अर्धशतके पूर्ण केली.
मिलरने अखेरपर्यंत नाबाद राहत 63 चेंडूवर 5 चौकार व 3 षटकारांसह 75 धावा केल्या. तर दुस-या बाजूने क्लासेननेही तशाच प्रकारची फलंदाजी करताना 65 चेंडूत 6 चौकार व 2 षटकारांच्या मदतीने 74 धावा कुटल्या. भारताकडून शार्दुल ठाकूरने दोन, तर कुलदीप यादव व रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.