पुणे : सिंगापूरमधील हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना दोन वर्षांच्या शिक्षणासाठी निधी देणाऱ्या ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूलच्या ‘ग्लोबल सिटीझन स्कॉलरशिप’च्या 15 व्या गटात भारतभरातील 17 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. पुण्यातील दोन विद्यार्थी यामोली व्यास आणि परी भटनागर या प्रतिष्ठित स्कॉलरशिपअंतर्गत सिंगापूरमधील हायस्कूलमध्ये त्यांचे शिक्षण पूर्ण करणार आहेत.
या शिष्यवृत्तीसाठी देशभरातील सुमारे 6 हजार विद्यार्थ्यांनी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज केला होता. निवडलेले विद्यार्थी पुढील दोन वर्षे तंत्रज्ञानदृष्ट्या माहितीपूर्ण परिसर स्मार्ट कॅम्पसमध्ये शिक्षण घेतील. हा कॅम्पस् डिजिटल सुविधा, नवीन शिक्षण पद्धती आणि अनुभवी शिक्षकांसाठी ओळखला जातो.
या विद्यार्थ्यांचा सत्कार नुकताच जीएसएफच्या अकॅडेमिक क्वॉलिटी अशुअरन्सचे संचालक प्रमोद त्रिपाठी यांच्या हस्ते करण्यात आला. निवडलेल्या विद्यार्थ्यांमध्ये गुरगाव, पलक्कड, जमशेदपूर, सुरत, मुंबई, हैदराबाद, बेंगळुरू, चेन्नई, दिल्ली, डेहराडून, कालिकत आणि चंदीगड येथील विद्यार्थी आहेत.