नवी दिल्ली – अभिनेते सोनु सूद हे काही दिवसांपूर्वीच आम आदमी पक्षाच्या सरकारचे ब्रॅंड ऍम्बेसिडर बनले आहेत. त्यांना दिल्ली सरकारच्या देश का मेंटॉर या उपक्रमासाठी ही जबाबदारी देण्यात आली. या उपक्रमा अंतर्गत विद्यार्थ्यांना करीअर विषयक मार्गदर्शन केले जाते. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी घोषणा केली होती.
तर आता नुकतीच आप पक्षाचा नेत्यांची बैठक दिलीत पार पडली या बैठकीत आपच्या नेत्यांसह गुजरात मधील अनेक व्यापारी सुद्धा उपस्थित होते. बैठकीत येणाऱ्या गुजरात विधानसभा निवडणुकीबाबत रणनीती तयार करण्यात आली आहे. याच बैठकीमध्ये सोनू सूद लवकरच प्रवेश करणार असल्याचे ठरले आहे.
तत्पूर्वी, सरकारी शाळांमध्ये अनेक गरीब घरांतील मुले येतात. त्यांना करिअर विषयी मार्गदर्शन करणारे फारच थोडे लोक उपलब्ध आहेत. आम्ही शिक्षित व्यक्तींना त्यांचे मार्गदर्शक म्हणून पुढे येण्याचे आवाहन केले आहे. या मुलांचे आपण मेंटॉर व्हा असे आवाहन आम्ही केले आहे. या उपक्रमासाठी सोनू सूद हे ऍम्बेसिडर म्हणून काम करणार आहेत.