नवी दिल्ली – सलूनमधील नाभिकाला हेअर ट्रीटमेंट देणे चांगलेच महागात पडले आहे. दिल्लीतील एका सलूनला चांगलेच महागात पडले आहे. एका मॉडेलचे केस मनासारखे कापले नाहीत म्हणून तब्बल २ कोटी रुपयांची नुकसानभरपाई त्याला द्यावी लागणार आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,’ २०१८ मध्ये हॉटेल आयटीसी मौर्य येथील सलून कर्मचाऱ्यांवर महिलेने चुकीच्या पद्धतीनं केस कापल्याबद्दल आणि तिला योग्य वागणूक न दिल्याबद्दल राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे तक्रार केली होती.
तिने आपल्या तक्रारीमध्ये नाभिकाच्या चुकीमुळे मला जवळजवळ आपले संपूर्ण केस गमवावे असल्याचे सांगितले होते. तक्रार करणारी महिला हेअर प्रोडक्टसाठीची मॉडेल होती. या प्रकरणावर आर के अग्रवाल आणि एस एम कानटीकार यांनी आता निर्णय सुनावला आहे. राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाने सलून मालकाला तिला 2 कोटी रुपयांची भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. नाभिकाने मीटिंग आणि आपल्या कामांकडेही पूर्णपणे दुर्लक्ष केलं. यामुळे तिला याचा मोठा तोटा सहन करावा लागल्याचं कोर्टानं म्हटलं.