सोनू सूदने सांगितला कोरोना हरवण्याचा फंडा, फॅन्सना दिला मोलाचा सल्ला…!

मुंबई – बॉलिवूडचा रिअल लाईफ हिरो म्हणजे, अभिनेता ‘सोनू सूद’ हा पहिल्या लॉकडाउनच्या काळात अनेकांसाठी देवदूत ठरला. करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर विविध भागांमध्ये अडकललेल्या पररराज्यातील स्थलांतरित मजुरांना आपल्या मुळ गावी पोहोचवण्यापासून ते अनेकांना आर्थिक मदत करेपर्यंत शक्य त्या सर्व परिंनी सोनूनं सढळ ह्स्ते मदत केली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonu Sood (@sonu_sood)

दरम्यान, मागील काही दिवसांपासून देशभरात करोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे. आणि करोनाचा हाच उद्रेक रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात 15 दिवसांची संचारबंदी लागू केली. परंतु तरीही राज्यात करोनाचा प्रकोप थांबायचं नाव घेत नाही. करोनाची दुसरी लाट अतिशय भयंकर असून, बॉलिवूडचे अनेक बडे कलाकार करोनाच्या विळख्यात सापडेल आहेत. त्यातच आता बॉलिवूडचा रिअल हिरो “सोनू सूद’ला सुद्धा करोनाची लागण झाली आहे. स्वतः सोनू सूद याने ट्विट करत याबाबत माहिती दिली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonu Sood (@sonu_sood)

तर आता सोनूने चाहत्यांना देखील हा सल्ला दिला आहे. सोनू म्हणतो की, आपण कोरोना पॉझिटिव्ह असाल, तर औषधांसह आपल्याला स्वतःला सकारात्मक ठेवावे लागेल आणि अशा प्रकारे आपण लवकरच बरे होऊ शकता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonu Sood (@sonu_sood)

तो पुढे  म्हणाला की, ‘मी सर्वांना सांगू इच्छितो की, जर तुम्ही कोरोना पॉझिटिव्ह असाल तर स्वतःची काळजी घ्या. कारण कोणीही दुसरे तुमची काळजी घेणार नाही आणि ही कोरोनाची ही सर्वात भयानक गोष्ट आहे. यामुळे तुम्हाला पूर्णपणे विलगीकरणात राहावे लागते.’

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.