नाशिक: ऑक्सिजन गळतीमुळे ११ जणांचा मृत्यू; मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

नाशिक : डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टाकीला गळती झाल्याने राज्यात एकच खळबळ उडाली आहे. या धक्कादायक घटनेत आता पर्यंत अकरा रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.याविषयीची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रशासनाच्या हवाल्याने दिली आहे.

ऑक्सिजन टाकीच्या वॉलमधून लिकेज झाल्यामुळे प्रेशर कमी झाले व 11 व्हेंटीलेटेड पेशंट मृत्यूमुखी पडल्याची धक्कादायक माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रशासनाच्या हवाल्याने दिली आहे.

महानगरपालिकेचे डॉ. झाकीर हुसेन कोविड सेंटरमधील टॅंकमध्ये ऑक्सिजन भरताना टॅन्कचा पाइपचा जोड तुटून ऑक्सिजन लीक झाला यामुळे अनेक कोरोना रुग्णांना इतरत्र हलवण्यात आले.

दरम्यान ऑक्सिजन न मिळाल्याने रुग्ण दगावले असण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती आता प्रशासनाच्या हवाल्याने आरोग्यमंत्र्यानी 11 रुग्ण दगावल्याचे सांगीतले आहे. तसेच मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.