पुणे – सिनेअभिनेत्रींची फॅशन फॉलो करण्याची क्रेझ तरुणींमध्ये नेहमीच दिसते. मात्र कधीकधी विअर्ड ड्रेस, मेकअप किंवा फॅशन करून अनेक सिनेअभिनेत्री ट्रोल होतात. यात प्रियांका चोप्रापासून दीपिका पदुकोनपर्यंत अनेक आघाडीच्या अभिनेत्रींचा समावेश होतो.
अभिनेत्री सोनम कपूरने देखील दिवाळीच्या निमित्तानं पारंपरिक पेहराव परिधान करून सुंदर फोटोशूट केले आहे. अनारकली ड्रेसमधील तिचा अवतार इतका सुंदर दिसत होता की पती आनंद आहुजा देखील फिदा झालाय. हे फोटो सोनम कपूरने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहे.
या फोटोमध्ये सोनम कपूरने ऑफ-वाइट रंगाचा अनारकली सूट परिधान केल्याचं आपण पाहू शकता. ड्रेसवर मॅचिंग रंगाच्या धाग्यांपासून इंट्रीकेट एम्ब्रॉयडरी वर्क करण्यात आले आहे. यासह तिनं स्टेटमेंट ज्वेलरी कॅरी केली होती. तर कुर्त्याला लेयरिंग पॅटर्न लुक देण्यात आला होता,
ज्यामध्ये दोन ते तीन लेअर्स दिसत आहेत. या संपूर्ण ड्रेस मध्ये सोनम खूप ग्लॅमर्स दिसत आहे. म्हणूनच तर, अभिनेत्री सोनम कपूरला फॅशन वर्ल्डमधील आयकॉन मानलं जातं.