मुंबई – हल्ली सोनम कपूर फिल्मी दुनियेपासून दूर आणि सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह आहे. ती सोशलवर आपलं मत बेधडकपणे मांडताना दिसत आहे. यातच तिने नुकतेच भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार अशिक्षित म्हटले आहे.
नेमकं झालं असं की, भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी नुकतेच LGBTQIA समुदायातील सदस्यांना सहभागी करुन घेण्याला विरोध दर्शवत आक्षेपार्ह वक्तव्य केली होती. त्यांच्या या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला आहे.
आता यावर बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरने सोशलवर त्याचा व्हिडीओ शेअर केला आहे आणि म्हणाली, ‘अशिक्षित, दुर्लक्ष करणारं आणि द्वेषपूर्ण’, असे कॅप्शन सोनमने शेअर केले. सोनमची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.