Sonalee Kulkarni – अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) मराठी सिनेसृष्टितील आघाडीची अभिनेत्री मानली जाते. आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने तिने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. ‘नटरंग’ या चित्रपटातील ‘अप्सरा आली’ या गाण्यामुळे तिला विशेष लोकप्रियता मिळाली.
सोनाली सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. वेगवेगळ्या फोटोशूटमधील फोटो ती आपल्या चाहत्यांबरोबर शेअर करते. नुकतेच दिवाळी निमित्त अभिनेत्रीने तिचे काही सुंदर फोटो इनस्टाग्रामवर शेअर केले असून, तिच्या नवीन घराविषयी माहिती देखील फॅन्सला दिली.
सोनाली कुलकर्णी हिने दुबई याठिकाणी नवीन घर खरेदी केलं आहे. अभिनेत्रीने नव्या घराचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. सध्या सर्वत्र सोनाली हिच्या नव्या घराची चर्चा रंगली आहे. ‘नव्या घरात पाडवा..’ असं लिहित सर्वांना पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
सध्या सोशल मीडियावर फक्त आणि फक्त सोनाली हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. यावेळी तिने सुंदर साडी परिधान केली असून, तिचा दिवाळी स्पेशल लुक फॅन्सला खूपच आवडला आहे. तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होताना दिसत आहे.