सोनाक्षी सिन्हा आता तेलगू इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करणार आहे. तेलगूमधील आघाडीचे दिग्दर्शक के. एस. रवींद्र उर्फ बॉबी यांच्या आगामी सिनेमात ती दक्षिणेतील सुपरस्टार चिरंजीवी यांच्याबरोबर काम करणार असल्याचे समजते आहे.
बॉबी यांनी सोनाक्षीला फोनवरून सिनेमाची कथा ऐकवली आहे. त्यावर सोनाक्षीने सकारात्मक प्रतिसाददेखील दिला आहे. या स्क्रिप्टबद्दल आणि त्यातील आपल्या रोलबद्दल ती खूपच प्रभावित झाली आहे. त्याचबरोबर चिरंजीवी यांच्याबरोबर तेलगूमध्ये पदार्पण करण्यासाठीही ती अगदी उत्सुक आहे.
या सिनेमासाठीचे कॉन्ट्रॅक्टवर ती लवकर सहीदेखील करणार आहे. या सिनेमाच्या शूटिंगलाही लवकरात लवकर सुरुवात व्हावी अशी तिची अपेक्षा आहे. याच वर्षी ऑक्टोबरमध्ये या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होणे अपेक्षित आहे.
आता लीड हिरोईन आणि स्क्रिप्ट दोन्हीही फायनल झाली असल्यामुळे चिरंजीवी यांनी या सिनेमाला प्राधान्य देण्याचे ठरवले आहे. या सिनेमानंतरच हॉलीवूडमधील “ल्युसिफर’च्या तेलगू रिमेकच्या कामाला ते सुरुवात करणार आहेत. सोनाक्षी सध्या “भूज-द प्राईड ऑफ इंडिया’ रिलीज होण्याची वाट बघते आहे. त्यामध्ये ती अजय देवगण आणि संजय दत्तबरोबर असणार आहे.