मुंबई विमानतळावर आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचा एक व्हिडिओ सध्या लोकांच्या नजरेत आहे. यावेळी त्या दोघांचा एअरपोर्ट लूक चर्चेत आला नसून लोकांना या दोघांमध्ये काहीतरी बिनसलं असल्याचे एका व्हिडिओमध्ये दिसून आले आहे. रणबीर कपूर ‘जानवर’ चित्रपटाच्या शूटिंगनंतर पत्नी आलिया भट्टसोबत दुबईला दीर्घ सुट्टीवर गेला होता.
यावेळीच त्यांचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दोघेही दुबई विमानतळावर दिसले, मात्र रणबीर कपूरच्या या वागण्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये आलिया भट्टसोबत रणबीर कपूर कॅमेऱ्यासमोर पोज देताना दिसत आहे.
रणबीर कॅमेराकडे वळताच त्याने आलियाच्या खांद्यावर हात ठेवला, या व्हिडिओला पाहून चाहते म्हणत आहे की, आलिया यात अनकम्फर्टेबल दिसत आहे. सोशल मीडियावर या व्हिडीओवर ज्या लोकांनी कमेंट केली आहे त्यातील बहुतांश लोक नकारात्मक आहेत. म्हणजेच यात आलिया अस्वस्थ दिसत आहे, असे बहुतेकांना वाटले आहे. या व्हिडिओवर संमिश्र प्रतिक्रिया येत आहे. एका युजर्सने रणबीरला पत्नीसोबत रोमँटिक कुठल्या पद्धतीने व्हायचे यावर सल्लाच दिला आहे. तर अनेकांनी या जोडीला बॉलिवूडची सर्वोत्कृष्ट जोडी असेही म्हटले आहे. वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, आलिया आणि रणबीरच्या आगामी चित्रपटाची चर्चाही काही दिवसांपासून सुरू झाली आहे. दोघेही नितेश तिवारी आणि मधु मंतेना यांच्या आगामी ‘रामायण’ चित्रपटात एकत्र दिसणार आहेत.