पुणे – कोणताही गंध न येणे आणि चव न लागणे असे करोना झाल्याचे लक्षण आहे. पण, करोनामुक्त झाल्यावरही काही जणांना गंधज्ञान होत नसल्याच्या तक्रारी आल्या आहेत. त्यांच्या नाकातील “गंधवाही’ क्षेत्रालाच मोठी क्षती पोहोचल्याचा प्रकार यातून होत आहे. पोस्ट कोविड सिमटम्समध्ये हा देखील अनोखा “साइड इफेक्ट’ दिसून येत आहे.
करोनाचे “साइड इफेक्ट्स’ शीर, हृदय, रक्तवाहिन्या, फुफ्फुस या सगळ्यांवर मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसून आले आहे. त्यातून व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांना तर जास्त काळजी घ्यावी लागत आहे. वरील नमूद केलेल्या लक्षणांशिवाय संधीवात वगैरेंच्याही अनेकांच्या तक्रारी येत आहेत. त्यात आता वासच न येण्याच्या प्रकाराची भर पडले आहे.
अशा प्रकारची लक्षणे असलेल्या रुग्णांचे प्रमाण सध्या अत्यल्प आहे. खासगी रुग्णालयांमध्ये किंवा प्रॅक्टिशनर्सकडे असे रुग्ण आले नाहीत, परंतु ससूनमध्ये असे रुग्ण पाहणीत आढळून आले आहेत. ससूनमधील फुफ्फुसविकार तज्ज्ञ डॉ. संजय गायकवाड यांनी याविषयी सांगितले की, “पोस्ट कोविडमध्ये असे रुग्ण आढळून आले आहेत. प्राथमिक तपासणीत ते आढळले आहेत.
करोनातील हे लक्षण नेमके किती काळ शरीरावर इफेक्ट करते, त्याविषयी मात्र आताच कोणताही अंदाज बांधता येणे शक्य नाही. मात्र, याच्या कारणांचा शोध घेतला जात आहे.’