मेष : नोकरीत हातातील कामे संपवून मगच सहकाऱ्यांना मदत करा. घरात व्यक्तींच्या गरजांना प्राधान्य द्याल.
वृषभ : व्यवसायात सभोवतालच्या व्यक्तींचा अंदाज घेऊन त्याप्रमाणे धोरण ठरवाल. प्रवास घडेल.
मिथुन : नोकरीत अस्थिरता राहील. परंतु योग्य निर्णय होऊन त्याचा लाभ तुम्हाला होईल. वरिष्ठांची मर्जी राहील.
कर्क : कामात चोख राहाल. बोलण्याने इतरांची मने दुखावणार नाहीत याची काळजी घ्या. प्रकृतीमान सुधारेल.
सिंह : नोकरीत कामाच्या स्वरूपात बदल संभवतो. रेंगाळलेली कामे गती घेतील. जोडधंद्यातून विशेष लाभ होईल.
कन्या : व्यवसायात योग्य वेळी योग्य व्यक्तींची मिळालेली मदत कामे आटोक्यात आणेल.
तूळ : सभोवतालच्या व्यक्तींचे सहकार्य खुबीने मिळेल. नोकरीत वरिष्ठ अवघड कामे तुमच्यावर सोपवतील.
वृश्चिक : नोकरीत भत्ते व सवलती मिळाल्याने तुम्ही खुश असाल. सरकारी कामात यश मिळेल.
धनु : प्रगतीचा आलेख उंचावत जाईल. पैशाची चिंता मिटेल. कामे पूर्णत्वाला आल्याने हायसे वाटेल.
मकर : अडथळयाची शर्यत पार करून दिलासा मिळाल्याने पुन्हा ताजेतवाने व्हाल. पैसे शिल्लक ठेवावेत.
कुंभ : हातातील कामे वेळेत संपवून मगच नवीन कामांकडे वळा. नोकरीत कोणतेही निर्णय घाईने घेऊ नका.
मीन : खेळत्या भांडवलाची तरतूदही करून ठेवाल. नवीन कामे दृष्टीक्षेपात येतील.