‘त्या’ आरोपींकडून भरभक्कम लाच घेतल्याने सीबीआयच्या रडारवर आपलेच काही अधिकारी

नवी दिल्ली – सीबीआयच्या रडारवर स्वत:चेच काही अधिकारी आणि कर्मचारी आले आहेत. बॅंक घोटाळ्यांच्या आरोपींकडून भरभक्कम लाच घेतल्याच्या आरोपावरून सीबीआयने आपल्या चार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला. तसेच, त्यांच्याशी संबंधित ठिकाणांवर छापे टाकले.

पोलीस उपअधीक्षक आर.के.ऋषी आणि आर.के.संगवान यांच्याबरोबरच निरीक्षक कपिल धांकड आणि स्टेनो समीरकुमार सिंह यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ते सर्व सीबीआयसाठी कार्यरत आहेत. त्यांच्याशी संबंधित गाझियाबाद, दिल्ली, नोएडा, गुडगांव, मेरठ आणि कानपूरमधील 14 ठिकाणी सीबीआयने छापासत्र हाती घेतले.

ऋषी सध्या गाझियाबादमधील सीबीआय प्रशिक्षण अकादमीत रूजू आहेत. त्यामुळे त्याठिकाणीही छापा टाकण्याची नामुष्की सीबीआयवर ओढवली. सीबीआयच्या संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांबरोबरच काही वकिलांवरही भ्रष्टाचार प्रतिबंधात्मक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

बॅंक घोटाळ्यांमध्ये गुंतलेल्या काही कंपन्यांविरोधातील तपासात तडजोड करण्यासाठी मोठ्या रकमांची लाच घेतल्याच्या आरोपाशी संबंधित हे प्रकरण आहे. मात्र, त्याचा अधिक तपशील मिळू शकलेला नाही.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.